Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

योगदिनानिमित्त राजाराम प्रतिष्ठान द्वारे समता महिला योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य योगप्रशिक्षण शिबिर संपन्न



अमरावती दिनांक २४ ( ग्रामीण उदय प्रतिनिधी)

योग दिनाच्या निमित्ताने "योग करा, निरोगी रहा" या संकल्पनेतून एक भव्य योगप्रशिक्षण शिबिर कांचन रिसॉर्ट अमरावती येथे संपन्न झाले आहे .या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.सुरेखाताई ठाकरे या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेविका सौ.निलिमाताई काळे, माजी नगरसेविका सौ. सुषमाताई बर्वे, समाजसेविका श्रीमती आशाताई दरने,समाजसेविका डॉ.सौ.वैशालीताई विधाते यांची उपस्थिती लाभली.

योग शिक्षिका विमल वानखेडे ,वैशाली  कोटांगळे यांनी सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षाताई डांगे यांनी अतिशय प्रभावी पद्धतीने पार पाडले. शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि योगासने, प्राणायाम, तसेच ध्यान यांचे महत्त्व जाणून घेतले. योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम अधोरेखित करण्यात आले आहे.

यामध्ये बाल योग  प्रशिक्षणार्थी संस्कार अमोलराव भुते याचा सुरेखाताई ठाकरे माजी जी. प . अध्यक्ष यांनी सत्कार केला आहे.


Post a Comment

0 Comments