Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जळगावच्या सुजाता बागूल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

 

 

नवी दिल्ली, दि. ३१(कार्यालय प्रतिनिधि) : जळगाव जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहायक परिचारिका सुजाता अशोक बागूल यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालेल्या समारंभात राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या १५  परिचारिका आणि परिचारकांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डाकेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधवअनुप्रिया पटेल आणि आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा उपस्थित होते.

आरोग्य क्षेत्रात गेली १८  वर्षे अत्यंत निष्ठेनेकष्टाने व समर्पित भावनेने सेवा बजावणाऱ्या सुजाता बागूल यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थात्मक प्रसवासाठी गरोदर महिलांना प्रोत्साहन देणेलसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करणेआरोग्य शिबिरेजनजागृती रॅली आणि स्वच्छता मोहिमांमध्ये प्रभावी सहभाग यांसारखे उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले आहे.

कोरोना काळातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना जिल्हास्तरीय 'फ्लोरेन्स नाइटिंगेल'सह विविध पुरस्कारांनी ही सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरुप  एक लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक प्रशस्तीपत्र आहे. 


Post a Comment

0 Comments