राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस

 


मुंबईदि. ३१ (कार्यालय प्रतिनिधि) : राज्यात मागील २४ तासांमध्ये (३० मे रोजी सकाळपर्यंत) धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस झाला आहे. तर बीड २४ मिमीजालना १३.९ मिमीसोलापूर १२.१ मिमी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज ३० मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :-  रायगड ०.३रत्नागिरी ३.९,  सिंधुदुर्ग ११.२,  पालघर ०.१नाशिक ०.६धुळे ०.४,  जळगाव ०.१अहिल्यानगर ०.५सोलापूर १२.१,  सातारा १,  सांगली ०.९,  कोल्हापूर ०.८छत्रपती संभाजीनगर ०.६जालना १३.९,

बीड २४लातूर ५.१,  धाराशिव ४२.२नांदेड ९.३,  परभणी ३,  हिंगोली ०.२बुलढाणा २.२अकोला ०.१वाशिम ०.२अमरावती ३.४यवतमाळ ६.५,  वर्धा ८.७नागपूर १.४भंडारा ०.७गोंदिया ३.९चंद्रपूर १.२ आणि गडचिरोली २.५.

धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले. मात्र पावसामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही

Post a Comment

0 Comments