Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

चांदुर बाजार चे एकात्मिक बाल विकास कार्यालय वार्‍यावर

प्रभारी प्रकल्प अधिकारी आनंद जाधव  कार्यालयाकडे पाठ

ब्राम्हणवाडा थडी, विलास खाजोने

 दिनांक १५

  चांदुर बाजार येथील पंचायत समिती च्या जुन्या इमारत मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प कार्यालय कार्यरत आहे. येथे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणुन या कार्यालयाचा प्रभार आनंद जाधव यांच्या कडे जानेवारी २०२६ मध्ये देण्यात आला. तेव्हा पासुन आनंद जाधव हे एक ते दोन वेळाच  येथील कार्यालयात आले.आनंद जाधव यांचे कडे उपायुक्त कार्यालय महिला बालकल्याण विभाग अमरावती  येथे बालकल्याण विभागात नियमित कारभार आहे. चांदुर बाजार चे एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय हे बालविकास प्रकल्प अधिकारी  आनंद जाधव यांनी वार्‍यावर  सोडले आहे. त्यामुळे अंगणवाड्याला भेट देणे ,अंगणवाड्याची तपासणी करणे त्याचा अहवाल पाठविणे,सुपरवासझर नियंत्रण ठेवणे या कडे दुर्लक्ष होत आहे. या कार्यालयाचा कारभार विस्तार अधिकारी के.जी.पाचपुते हेच कार्यालयाचा कारभार सांभाळतात.

येथील कार्यालयात एक विस्तार अधिकारी के.जी.पाचपुते हे नियमित कार्यरत असतात.कनिष्ठ लिपिक आर.डी लंगोटे,परिचर राजेश ठाकरे हे कार्यरत आहे.या कार्यालयात बालविकास अधिकारी पद व वाहन चालक ,सुपरवायझर चे पाच पद रिक्त आहे.या कार्यालयाला वाहनच नाही आहे. अंगणवाडीचे दौरे करताना अडचण निर्माण होते.चांदुर बाजार तालुक्यात २३६ अंगणवाड्या आहे.सुपरवायझर ची एकुण ९ पदे आहे. आसेगांव , करजगांव ,ब्राम्हणवाडा थडी,तळवेल,शिरजगांव कसबा,घाटलाडकी,तळेगांव मोहना,कुर्‍हा,शिरजगांव बंड अशी ९ पदे आहे.यापैकी सुपरवाझर ची ४ पदे भरली आहे. तसेच सुपरवायझर ची कुर्‍हा,करजगांव,घाटलाडकी,शिरजगांव कसबा,तळवेल पाच  पदे रिक्त आहे.सुपरवायझरची ४ पदे भरली आहे.त्यांना रिक्त असलेल्या सुपरवायझर पदाचा कारभार देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments