Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

एच पी व्ही लसीकरण टाळेल गर्भाशय मुखाचा कॅन्सर

 

चांदूरबाजार दिनांक१५  विलास खाजोने ( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

      गर्भाशयाचा कॅन्सर हा जगात आढळणाऱ्या कॅन्सर पैकी दुसऱ्या क्रमांकावर असणारा कॅन्सर असून एच पी व्ही लसीकरण या कॅन्सर ला टाळू शकते, असे प्रतिपादन आयुष्मान आरोग्य मंदिर, शिरजगाव बंड येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ नेहटकर यांनी ज्ञानोदय विद्यामंदिर, चांदुर बाजार येथे पालक - विद्यार्थी - शिक्षक - कर्मचारी यांच्या सभेमध्ये केले.

                जिल्हा आरोग्य अधिकारी  यांच्या आदेशाने तालुका आरोग्य अधिकारी, चांदुर बाजार डॉ डकरे मॅडम व पी एच सी तळवेळचे वैद्यकीय अधिकारी डॉ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि 11/4/26 ला ज्ञानोदय विद्या मंदिर, चांदुर बाजार येथे पालक -विद्यार्थी -शिक्षक -कर्मचारी यांची सभा घेण्यात आली. यावेळी आयुष्मान आरोग्य मंदिर चे डॉ नेहटकर (सी एच ओ ) व कु. सारिका सातव ( आरोग्य सेविका ) यांनी उपस्थितांना माहिती दिली. एच पी व्ही विषाणू हा गर्भाशयाचा कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत असून हा कॅन्सर टाळण्यासाठी आरोग्य विभागाने दि 8मार्च 2026 ला महिला दिनाचे औचित्य साधून एच पी व्ही लसीकरण मोहीम संपूर्ण राज्यभर चालू केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेद्वारे मान्यता प्राप्त  व जवळपास 4 हजार रुपये किमतीची हि लस 14 ते 15 वयोगटातील मुलींना जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेमध्ये मोफत दिल्या जाते. या कॅन्सर विरुद्धचे लसीकरण जगातील 150 देशांमध्ये चालू आहे, 50 देशांमध्ये तर हि लस मुलांना सुद्धा दिली जाते. जगात जवळपास 50 कोटी स्त्रियांनी एच पी व्ही लस घेतलेली आहे. या अभियान दरम्यान लस दिलेल्या मुलींना कुठलाही त्रास झालेला नाही. त्यामुळे निसंकोचपणे पालकांनी त्यांच्या मुलींचे हित लक्षात ठेऊन  हि लस जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये द्यावी असे आवाहन करण्यात आले. यासंबंधी त्यांनी विविध तज्ज्ञ डॉक्टर्स, अधिकारी व वृत्तवाहिन्यांचे दाखले दिले.

       उपस्थित पालकांनी आपल्या मुलींना हि लस लावून घेण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच हि लस इतर वयोगटातील स्त्री - पुरुषांकरिता मोफत उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. यावेळी मुख्याध्यापक श्रीमती खांडे मॅडम, शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी, अशोक जावरे (आरोग्य सेवक),श्रीमती सोनाली गणोरकर, श्रीमती अर्चना यादव (आशासेविका) उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments