Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

महान समाज सुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर


     दि.९ 


बाबासाहेब आंबेडकर
  यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला, त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शालेय जीवनात असताना  कठीण परिस्थिती सोबत  संघर्ष करावा लागला आहे., अपमान सहन करावा लागला आहे. शाळेमध्ये शिकत असताना त्यांना वर्गाबाहेर बसवल्या जात होते. पिण्याच्या पाण्याच्या माठाला सुद्धा स्पर्श न करण्याची मुभा नव्हती. आपल्या देशात अस्पृश्यता काय असते, याचा चांगला अनुभव त्यांना शालेय जीवनातच आला आहे. त्यांचे वडील ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते त्यामुळे शाळेत जाता आले परंतु वर्गाबाहेर बसून त्यांनी शालेय जीवन पार पाडले आहे. पदवीचे शिक्षण घेत असताना मुंबईमध्ये बडोदा संस्थानचे संस्थापक सयाजीराव गायकवाड यांच्याकडून शिष्यवृत्ती मिळत होती. करारानुसार त्यांनी शिक्षणानंतर बडोद्याला परत येण्याचा निर्णय घेतला. विदेशात शिक्षण घेत असताना कोलंबिया विद्यापीठातून एम ए पी एचडी पदवी प्राप्त केली पुढील शिक्षणाला ते लंडनला गेले शालेय जीवनामध्ये त्यांनी २४ तासांपैकी १८-१८ तास अभ्यास करायचे ग्रंथालयामध्ये सर्वात प्रथम ते आत जायचे आणि सर्वात शेवटी ते बाहेर यायचे एवढी  त्यांची अभ्यासाबद्दल चिकाटी जिद्द होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले की लोकांना संविधाना शिवाय दुसरं काहीही दिसत नाही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे कार्य म्हणजे संविधानाची निर्मिती बहुतांश लेखक आणि  समाजातील वक्ते सुद्धा बाबासाहेबांबद्दल लिहिताना बोलताना संविधान आणि राजकारण यावरच भर देत आहे. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर  सर्व समाजाचे आदर्श

     बाबासाहेबांनी दलितांसाठी न्याय, समान वागणूक या साठी महत्वपूर्ण कार्य केलेच आहे. समाजातील मागासलेल्या सर्व घटकांसाठी, स्त्रियांसाठी सुद्धा त्यांनी फार मोठे कार्य केलेले आहे, पण ते सांगितले जात नाही. त्यामुळे बाबासाहेब फक्त दलितांचेच हा भ्रम पसरविण्यात समाजातील काही धूर्त यशस्वी होत आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे अफाट व्यक्तिमत्व आपण अजानतेमुळे संकुचित करून ठेवत आहे .बाबासाहेबांना एकूण ११ भाषा येत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशात विदेशात एकूण 32 पदव्या मिळवल्या होत्या. आपल्याला एक पदवी घेताना किती कष्ट पडतात हे  आपण जाणतो, वकिली शिक्षण पूर्ण करून त्यांनी  त्याच कॉलेजला प्रिन्सिपल पद हे देखील भूषवलेले आहे. विदेशात जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवणारे हे पहिले भारतीय होते. 

शेतकऱ्यांकरिता कार्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकार विरोधात फार मोठा संघर्ष केला आहे .त्यांच्या जीवनातील पहिला मोर्चा १० जानेवारी १९३८रोजी शेतकऱ्यांसाठी विधिमंडळावर मोर्चा काढला. कुठल्याही जाती धर्मावर नसून शेतकऱ्यांसाठी हा काढलेला मोर्चा होता. शेतकऱ्यांची किमान मजुरी देण्याची कायद्यामध्ये सोय करून द्यावी तसेच जमिनीचे किमान उत्पन्न ठरवून त्यापेक्षा कमी उत्पनावर शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करावा तसेच सावकारशाही संपुष्टात आणावी, जेणेकरून सर्वसाधारण शेतकरी जगू शकेल हे या मोर्चाची उद्दिष्टे होती.

पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर

पत्रकारिता मध्ये  बाबासाहेबांनी  फार मोठे योगदान दिले आहे .१९२० मध्ये मूकनायक पाक्षिक त्यांनी सर्वप्रथम सुरू केले होते पुढे शिक्षणासाठी विदेशात गेल्यानंतर मूकनायक बंद पडले त्यानंतर ४नोव्हेंबर १९२७ मध्ये बाबासाहेबांनी दुसर पाक्षिक बहिष्कृत भारत काढले तसेच २४नोव्हेंबर १९३० ला जनता व पुढे प्रबुद्ध भारत अशी वृत्तपत्रे काढली. बाबासाहेबांचा  बिनतोड युक्तिवाद बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा धाटणीची मांडणी यामुळे पत्रकार क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे.अत्यंत निर्भीड दर्जेदार रोखठोक पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. १९४२ते १९४६ च्या काळात बाबासाहेब व्हॉइस रायच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले त्यांच्याकडे वीज जलसंपदा व कामगार खाते होते स्वस्त वीज उपलब्ध झाल्याशिवाय औद्योगिक प्रगती घडणार नाही आणि त्याशिवाय कोट्यावधी भारतीय दारिद्र्य दुष्टचक्रातून बाहेर पडू शकणार नाही ही बाबासाहेबांची भूमिका होती, त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट चित्रकार, उत्तम हार्मोनियम वादक होते. एकदा मुलाखतीमध्ये म्हणताना ते सांगतात, माझ्याकडे चित्र विकत घेण्याइतके पैसे नाही तर पुस्तकांप्रमाणे मी चित्रही विकत घेतली असती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची अभ्यासाची खूप आवड होती त्याकरता ते जिथे मिळेल तिथून पुस्तके विकत घेत असे लायब्ररीमध्ये २४तास घालवत, त्या काळात त्यांची जगातील सर्वात मोठी खाजगी लायब्ररी होती ज्यामध्ये ९०००० पुस्तके होती स्वतःच्या राहण्याकरता छोटे घर आणि पुस्तकाकरीता त्यांनी फार मोठं घर बांधलेलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, मानववंश शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, भाषाशास्त्र, धर्मशास्त्र, इतिहासकार, पर्यावरण राजकारण, कायदा पंडित, पत्रकारिता या सर्व विषयांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे या विषयांमध्ये त्यांचा फार मोठा हातखंडा होता. समाजामध्ये जन्मापासून सातत्याने त्यांना सामाजिक विषमतेला तोंड द्यावं लागलं आहे .त्यामुळे समानन्यायाच प्रस्थ निर्माण करण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं. त्यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत अजूनही समाजामध्ये आवश्यकता असलेले जिवनाचे सार असे आहे म्हणूनच त्यांना ज्ञानाचा अथांग सिंधू , चालतं बोलत ग्रंथालय असं संबोधल्या जातं डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमीच सांगायचे "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा"

* जो व्यक्ती शिकेल तो व्यक्ती वाघासारखे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही"

*  ही त्यांची शिकवण होती. शिक्षण म्हणजे वही पेन पुरता मर्यादित नसून बुद्धीला सत्याकडे नेणारा मार्ग आहे ,भावनेला संवेदनशील ते कडे नेणारा मार्ग आहे, शरीराला श्रमाकडे नेणारा मार्ग आहे हे ते नेहमी सांगत.

 "पेटवून अन्यायाची चीड, केले जिवाचे रान,

दिला सर्वांना समानतेचा मान"

 असे "राज्यघटनेचे शिल्पकार लिहिले ज्यांनी हे संविधान"

असे हे महामानव प्रज्ञासूर्य, चौदावे रत्न भारताला मिळाले त्याबद्दल भारतातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आणि गर्व असायलाच हवा.

सौ. सुरेखा दामेधर

अध्यक्ष 

 (विदर्भ पश्चिम)

 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ 

महिला मंच

Post a Comment

0 Comments