चांदूर बाजार परिसरात राजस्थानच्या 'वाळवंटी जहाजांचे' आगमन; नागरिकांमध्ये कुतूहल - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 8, 2026

चांदूर बाजार परिसरात राजस्थानच्या 'वाळवंटी जहाजांचे' आगमन; नागरिकांमध्ये कुतूहल

 


दि.९ चांदूर बाजार (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):

राजस्थानची ओळख आणि 'वाळवंटातील जहाज' मानले जाणारे उंट सध्या चांदूर बाजार तालुक्यात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. उन्हाळ्याच्या तीव्रतेत चारा आणि पाण्याच्या शोधात हे उंट या भागात येत असतात .
चारा आणि पाण्याच्या शोधात भटकंती
राजस्थानमध्ये उन्हाळा सुरू होताच पाण्याचे स्त्रोत आटतात आणि चाऱ्याची टंचाई निर्माण होते. अशा वेळी हे उंटपालक आपल्या उंटांच्या ताफ्यासह लांबचा प्रवास करत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दाखल होतात. सध्या चांदूर बाजार परिसरात अशा उंटांची मोठी झुंबड पाहायला मिळत आहे. हे उंट शिवारात फिरून आपला चारा शोधत असल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांचे वेधले लक्ष
एरवी केवळ टीव्ही किंवा पुस्तकात दिसणारे उंट प्रत्यक्ष आपल्या गावात पाहायला मिळाल्याने लहान मुलांसह मोठ्या माणसांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. रस्त्याने चालणाऱ्या उंटांच्या रांगा अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. अनेक ठिकाणी नागरिक थांबून या 'वाळवंटी जहाजांचे' फोटो काढताना आणि त्यांना कुतूहलाने न्याहाळताना दिसत आहेत.
या अनोख्या दृश्यामुळे सध्या संपूर्ण चांदूर बाजार परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages