अमरावती, दि. १० : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, दुपारी 2 वाजता श्री. बावनकुळे हे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी केलेल्या नवीन शासकीय वाहनांचा लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यानंतर 4 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त समाज कल्याण योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप कार्यक्रम, तसेच सायंकाळी 5 वाजता इलेक्ट्रॉनिक्स मिडीया असोसिएशनतर्फे आयोजित गजलनवाज भिमराव पांचाळे यांचा अमृत महोत्सव व नागरी सत्काराला उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गुरूवर्य अंबादासपंत वैद्य मार्गाचे नामकरण आणि कुस्ती मॅटचे उद्घाटन करतील.
श्री. बावनकुळे हे सायंकाळी 7 वाजेनंतर डॉ. सुनील देशमुख, नगरसेवक ऋषिकेश देशमुख आणि सुरेखा ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील. त्यानंतर रात्री 8.30 वाजता नागपूरकडे प्रस्थान करतील.
Post a Comment
0 Comments