"तेव्हा 'मीठ' आज 'माती': सत्याग्रहाची मशाल आजही पेटतीच!" - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, April 6, 2026

"तेव्हा 'मीठ' आज 'माती': सत्याग्रहाची मशाल आजही पेटतीच!"

दि. ६ :- 

"साम्राज्याचा पाया हादरवणारी ती 'मूठ': मिठाच्या सत्याग्रहापासून शेतकरी आंदोलनापर्यंत..."

 

उचललेस तू मीठ मूठभर,
साम्राज्याचा खचला पाया!
-----------------------------------

भारतीय स्वतंत्रलढ्यात ज्याचा उल्लेख आवर्जून करायलाच हवा असा तो मिठाचा सत्याग्रह आणि त्याला जोडूनच आठवावी ती दांडी यात्रा. ब्रिटिशांनी मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात १९३० साली केवळ लोकांच्या सहभागावर उभारलेला हा सत्याग्रह होता.
मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा साबरमती आश्रमापासून १२ मार्च १९३० रोजी सुरू झाली त्यावेळी गांधीजींच्या बरोबर त्यांची ७८ निवडक लोकं होती. त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता. यात्रा पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा २४ दिवस चालली आणि तिच्यातील सहभागी लोकं ३८५ कि.मी. पर्यंत पायी चालले. यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल १९३० ला पोहोचली. या देशातील समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवणे हा या देशातील लोकांचा हक्क आहे, आणि पाहुणे असलेले ब्रिटिश सरकार त्यावर कर लावू शकत नाही. या विचारांनी मूठभर मीठ हातात घेऊन दांडी यात्रा तर संपली, मात्र त्यातूनच अहिंसक सत्याग्रहाची एक यात्रा अवघ्या देशभरात निघाली.
नंतरच्या काळात स्वातंत्र्यचळवळीतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना अटक होऊन देखील लोकांच्या जिद्दीवर हा सत्याग्रह चालू राहिला. मिठाच्या कारखान्यात पोलिसांच्या लाठीहल्ल्यातून जखमी होत होत सामान्य माणसं असामान्य सत्याग्रह करतच राहिली.
त्यावेळी मीठ होतं आणि आज माती आहे. त्यावेळी मिठावर परक्या ब्रिटिश सरकारने लावलेला कर होता, आणि आज शेतीवर केंद्र सरकारने लावलेले तीन जाचक कायदे आहेत. या कायद्यांच्या विरोधात लढणं हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages