दि. ४ :-
मनोहर भाऊ आलात का ? होय बापूसाहेब नुकताच आलो कुटुंबाला घरी घ्यायला गेलो होतो ? एवढ्या कमी वेळात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या महिला भगिनींनी महिला दिनाचा कार्यक्रम घेतला. किती छान ना...! हो मनोहर भाऊ संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही दाखवता सुध्दा येत नाही तो केवळ संघटनेच्या कार्यातून सिद्ध होत असतो आणि तो आपल्या अमरावती च्या भगिनींनी सिद्ध केला. नुकत्याच कांचन रिसॉर्ट येथे झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिरसगाव कसबा निवासी मनोहर भाऊ सुने आणि प्रदेशाध्यक्ष जळगाव जामोद निवासी कैलास बापू देशमुख यांचा वार्तालाप ऐकला होता आणि खरोखरच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या कार्यातून खूप काही सिद्ध होत आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना ही १९९६ ला स्थापन होऊन आज ३० वर्ष पूर्ण होऊन ३१व्या वर्षात पदार्पण करीत आहे. हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्त्वकांक्षा न बाळगता प्राण पणाला लावून लेखणीने लढलो की त्यांचा विजय तितकाच आनंददायी असतो हे या संघटनेच्या माध्यमातून अनुभवास आले. महिला अध्यक्ष डॉ. मंजुषा सागर संघाविषयी बोलताना म्हणतात की संघ हा एकमेकांना घेऊन चालत गुणदोषासह स्वीकारणारा संघ आहे, पत्रकारिता आज सोपी नाही ती सोपी बनवावी लागते काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष देऊन तर काही गोष्टींच्या खोलवर मुळात जाऊन.
'संघ’ हा शब्द संस्कृतमधील ‘समुदाय’
एकाच विचाराने प्रेरित होऊन एकाच उद्देशासाठी लढणारे लोक एकत्र येऊन जो गट तयार होतो त्याला संघ
असे म्हणतात.तसेच अनुकूल दिवसात दिसणारी शंभर डोकी म्हणजे संघटना नसून प्रतिकूल दिवसात साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना असे देखील म्हणता येणार नाही.हवेबरोबर तोंड फिरवणारी डोकी म्हणजे संघटना नव्हे तर वादळातही ठामपणे पाय रोवून आपल्या ध्येयाशी इमान राखणारे शिलेदार म्हणजे संघ होय. म्हणूनच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ ग्रामीण भागासह शहरी भागात तसेच संपूर्ण राज्यभर आपलं कार्य इमाने इतबारे पूर्ण करून मानाचा तुरा रोवतो आहे.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने बीजाचे संगोपन चौकस बुद्धीने केले.आता या संघाचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या शाखा किती, पाने किती याची मला तरी मोजदाद करणे अवघड आहे. पण हा संघ जनमानसात खोलवर आपली मुळे रोवून समर्थपणे दिमाखात उभा राहून आपल्या गती आणि शैलीने विकास करीत आहे. अनेक ज्येष्ठ मंडळींनी आपल्या कार्याचे जणू कवचच दिले आहे असं म्हणावं लागेल.संघटित रहा… संघर्ष करा…विकास घडवा…!!!
वाटा सापडत जातील, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्विकारीत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तो क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल, तुम्ही क्षमता दाखवत जा, यालाच जीवन एक संघर्ष म्हणतात!
संघाचा आपुलकीने जर विचार केला तर संघ काल आज आणि उद्या याचा अभ्यास करता येईल.
संघाचे कार्यकर्ते तत्त्वनिष्ठ, समाजाबद्दल आपुलकी असणारे, शिस्तबद्ध आहेत.संघटनेच्या ध्येय-उद्दिष्टांशी एकनिष्ठ राहून, इतिहास व वर्तमानाची जाण कायम ठेवतात, पदलोभ न बाळगता काम करतात.
संघटनेच्या कार्यकर्त्याची आदर्श वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास तत्त्वनिष्ठा आणि ध्येय होयं.संघटनेची विचारसरणी आणि अंतिम ध्येय प्रत्येकाला पूर्णतः मान्य आहे. लोकांबद्दल प्रेम आणि आदरभाव त्यांच्यात मला पहावयास मिळतो.
पदलोभी नसून पदाची लालसा न बाळगता नि:स्वार्थीपणे कार्य करणाऱ्यांची संख्या देखील पत्रकार संघात कमी नाही
हलक्या कानाचा न राहता, अफवांवर विश्वास न ठेवता, तथ्यांची पडताळणी करणारी राजेंद्र भाऊ सारखी मंडळी यात आहेत.
एक चांगला कार्यकर्ता हा संघटनेचा कणा असतो, हे या पत्रकार संघाच्या माध्यमातून वेळोवेळी सांगण्याची गरज कोणाला भासत नाही. उत्साह आणि एकता या बळावर संघटनेची पाळेमुळे अधिकच घट्ट होत आहे. ना नफा ना तोटा म्हणजेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ होय. फक्त आणि फक्त संकल्प कार्यात समरसता समाजोपयोगी कार्याने संघाची माळ माझ्या समस्त पत्रकार बंधू भगिनींना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ स्थापनेच्या माझ्या लेखणीतून समस्त बंधू भगिनींना शुभेच्छा...!
सौ.कंचन मूरके,
(प्रदेशाध्यक्ष )
महिला मंच,
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र )
Post a Comment
0 Comments