पंडित दीनदयाळ उपाध्याय. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, April 3, 2026

पंडित दीनदयाळ उपाध्याय.



* पंडित दीनदयाळ उपाध्याय (१९१६-१९६८) हे भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक प्रखर राष्ट्रवादी विचारवंत आणि एकात्मक मानवादाचे पुरस्कर्ते होते. तसेच हे भारतीय राजकारणी, तत्ववेत्ता आणि भारतीय जनसंघाचे (आताचा भारतीय जनता पक्ष) एक प्रमुख नेते होते. त्यांना 'एकात्म मानववाद' (Integral Humanism) या विचारसरणीचे प्रणेते मानले जाते. त्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे फळ पोचवण्याचे अंतोदय ध्येय मांडले आणि भारतीय संस्कृतीवर आधारित राजकीय सामाजिक विचारसरणी विकसित केली.

* एकात्म मानवाला : त्यांनी पाश्चात्त्य भांडवलशाही आणि साम्यवाद या दोन्हीला नकार देत 'एकात्म मानवात' हा विचार मांडला हा विचार मनुष्य समाज आणि निसर्ग यांच्यातील समतोल साधण्याचा भर देतो. 

* अंत्योदय संकल्पना: समाजाच्या रांगेतील शेवटच्या माणसाचा विकास झाला पाहिजे त्याला त्यांनी 'अंत्योदय' विकासाचे मापन हे समाजातील सर्वात गरीब व्यक्तीच्या प्रगतीवरून केले जावे असे त्यांचे मत होते. 

* भारतीय जनसंघाचे कार्य:  त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत भारतीय जनसंघाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. ते दीर्घकाळ भारतीय जनसंघाचे सरचिटणीस आणि नंतर १९६७ मध्ये अध्यक्ष म्हणून संघटनेचा विस्तार केला त्यांनी जनसंघाला व्यक्तिनिष्टेत कडून विचारनिष्ठतेकडे नेले. 

* पत्रकारिता आणि लेखन: त्यांनी 'राष्ट्र धर्म' या मासिक पत्रिकेची स्थापना केली याशिवाय पंचजन्य आणि 'स्वदेश' यांच्यासारख्या प्रकाशानाद्वारे त्यांनी राष्ट्रीय विचार मांडले.

संघटनात्मक कौशल्य: त्यांना एक उत्तम संघटक मानले जाई. डॉ. मुखर्जी यांनी त्यांच्याबद्दल म्हटले होते की, "जर मला दोन दीनदयाळ मिळाले असते, तर मी भारताचे राजकीय चित्र बदलले असते".

स्वदेशी आणि स्वावलंबन: त्यांनी भारताच्या विकासासाठी पाश्चात्य भांडवलशाही किंवा साम्यवादापेक्षा भारतीय संस्कृतीवर आधारित 'स्वदेशी' अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला.

लघु उद्योगांना महत्त्व: ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी विकेंद्रित अर्थव्यवस्था आणि लघु उद्योगांना चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांचे मत होते.

पत्रकारिता: त्यांनी 'राष्ट्रधर्म', 'पाञ्चजन्य' (साप्ताहिक) आणि 'स्वदेश' (दैनिक) यांसारखी प्रकाशने सुरू करून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले.

साहित्य: त्यांनी 'सम्राट चंद्रगुप्त' आणि 'जगतगुरु शंकराचार्य' यांसारखी चरित्रेही लिहिली आहेत.

 * स्मृती दिनानिमित्त सूरू झालेल्या योजना: त्यांच्या विचारांना मूर्त रूप देण्यासाठी भारत सरकार तर्फे 'दीनदयाळ उपाध्य ग्रामीण कौशल्य योजना' (ग्रामीण तरुणांसाठी रोजगार) आणि 'दीनदयाल उपाध्ये योजना' यासारख्या अनेक योजना कार्यान्वित आहे.

   पंडित दीनदयाल उपाध्याय हे साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे प्रतीक होते. ज्यांनी राष्ट्रसेवा आणि मानव कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन संपर्पित केले.

त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने अनेक योजनांना त्यांचे नाव दिले आहे, जसे की 'दीनदयाळ अंत्योदय योजना' आणि 'दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना'. ११ फेब्रुवारी १९६८ रोजी मुघलसराय रेल्वे स्थानकाजवळ त्यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages