Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अंगणवाडी सेविका नियुक्तीचा तिढा: ॲड. राजूभाऊ कलाने यांचा प्रशासकीय दिरंगाईविरुद्ध एल्गार!


मनीषा आमटे यांना तात्काळ अंगणवाडी सेविका मदतनीस पदावर नियुक्ती द्यावी..... अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा    
ॲड.राजूभाऊ मधुकरराव कलाने, यांचा प्रलंबित नियुक्ती करिता बेजबाबदार अधिकारी व प्रशासनाला इशारा...

अमरावती (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):-
(११ एप्रिल २०२६)


अमरावती जिल्ह्यातील येणारे गाव रिद्धपुर (काशी), ता.मोर्शी. जि. अमरावती,अंगणवाडी केंद्र क्र.२ रिद्धपुर (काशी), ता.मोर्शी. जि. अमरावती, या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस म्हणून गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र असलेल्या सौ. मनिषा मोहन आमटे, (लग्नापूर्वीचे नाव कु. मनिषा लक्ष्मणराव खडसे ) यांची तात्काळ नियुक्ती करून, जाणीव पूर्वक नियुक्तीला विलंब करणाऱ्या अधिकाऱ्या विरुद्ध तात्काळ कर्तव्यावर कसूर केल्याबाबत शिस्तभंगाची व निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत दि. २६/०३/२०२६ रोजी दिलेल्या ॲड.राजूभाऊ मधुकरराव कलाने, (विदर्भ कार्यवाहक/विधी सल्लागार) मातंग अस्मिता संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य (Mass) यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ,सामाजिक न्याय मंत्री , आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय मुंबई  आणि अनुसूचित जाती आयोग महाराष्ट्र यांना दि.०९/०४/३०१६ रोजी निवेदन देऊन संबंधित अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी करिता मागणी करण्यात आली.निवेदनात म्हटल्याप्रमाणे तेव्हा  दि. २६/०३/ २०२६ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी दिलेल्या पत्र जा. क्र. एबाविसेयो/अंगणवाडी/का-७ /से.म./पदभरती/२०२५-२६/१५९० नवी मुंबई द्वारे मार्गदर्शन पत्रातील मार्गदर्शन आणि अर्जदार मोहन बाबुराव आमटे, यांनी दिलेल्या दि. २६/०३/२०२६ रोजी दिलेल्या पत्रातील पाठपुरावा तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कार्यालय मोर्शी यांनी दिलेल्या दि. २३/०७/२०२५ रोजीचे पत्र क्र.जा.क्र.एबाविसेयो/मोर्शी/आस्था/ ५१३/२०२५ यानुसार परिशिष्ट ‘ब’ प्राथमिक यादीप्रमाणे प्रमाणपत्रनुसार मिळालेल्या गुणांकानुसार व पात्र व अपात्र उमेदवाराच्या नावाच्या यादीमधील पात्रता धारक व निवड समितीच्या निर्णयानुसार निवडीस पात्र असलेल्या निवड यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आलेल्या मनिषा मोहन आमटे या पूर्णपणे अंगणवाडी सेविका केंद्र रिद्धपुर (काशी), ता.मोर्शी. जि. अमरावती, येथील मदतनीस या पदाकरीता आपण आपल्या स्तरावर नियुक्ती संदर्भातील विभागातील अधिकारी यांना तात्काळ दिशानिर्देश देऊन रखडलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस पदाच्या नियुक्तीकरिता तात्काळ नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात यावे. तसेच सदर पीडित महिलेच्या शारीरिक, मानसिक व आर्थिक नाहक त्रासाला जबाबदार संबंधित अधिकारी यांच्यावर पदाचा दुरुपयोग करून एका सुशिक्षित, होतकरू, गरजुवंत, जबाबदार आणि प्रामाणिक महिलेला काही विशिष्ठ समाजाच्या, जातीच्या दबावाखाली राहून गलीच्छ राजकारण याला बळी पडून जाणीवपूर्वक पदनियुक्ति पासून वंचित ठेवल्यामुळे संबंधित उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अमरावती - विलास मरसाळे, महिला व बाल विकास योजना अधिकारी तात्पुरता कारभार असलेल्या सुजाता खुजे मोर्शी तहसील. ता. मोर्शी,जि. अमरावती व विस्तार अधिकारी (सांखिकी) - कीर्ती तळेगावकर मोर्शी तहसील. ता. मोर्शी,जि. अमरावती या अधिकाऱ्यांवर आणि ग्रामपंचायत कार्यालय रिद्धपुर तत्कालीन सरपंच दरख्शा नाज सज्जाद अहेमद शेख, यांच्यावर शिस्तभंग केल्याबाबत तात्काळ चौकशी समिती गठित करून निलंबनाची कार्यवाही आपल्या स्तरावर करण्यात यावी. अशी मागणी सादर निवेदनाद्वारे आपणांस करित आहोत. तसेच निवेदनावर कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपना केल्याचे आढळून आल्यास आपल्या विरुद्ध भविष्यामध्ये पीडित महिलेचे संपूर्ण कुटुंब व मातंग अस्मिता संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य (Mass) यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समविचारी संघटनांना व राजकीय पक्षांना सोबत घेऊन नाईलाजस्तव कठोर होऊन उग्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही करू याची आपण नोंद घ्यावी. तसेच सदर आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानिस आपण स्वतः जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी .असा इशारा ही निवेदनातून देण्यात आलाय.निवेदन देतेवेळी प्रामुख्याने ॲड. राजूभाऊ मधुकरराव कलाने, ॲड.प्रदीप वाघमारे,पीडित महिला मनीषा आमटे ,पीडितेच्या पती मोहन आमटे ,निलेश खडसे जिल्हाध्यक्ष मातंग अस्मिता संघर्ष सेना ,अमरावती जिल्हा आणि दोन मुलं बाळ प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments