Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मुरके भवनात गंणगौर उत्सव साजरा



-उद्यापनाने केली उत्सवाची सांगता
-गौर गौर गोमती, ईसर पूजे पार्वती च्या स्वरांनी परिसर भक्तीमय

अमरावती - दिनांक  २४  ( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

     काठेसू आयी गौरा, काठेसू आया ईसर, कठेसू आया हे,  गौरी पूजन वाला...तर नदी किनारे नौका डोले, नौका में गणगौर" म्हणत साजरा होणारा व महत्त्वाचा मानला जाणारा ‘गणगौर’ हा सण मुरके भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

 कथेनुसार गण म्हणजे भगवान शंकर व गौरी म्हणजे देवी पार्वती म्हणून या उत्सवात शंकर व पार्वतीची पूजा मोठ्या आनंदात करण्यात आली. अविवाहित मुलींनी चांगला पती मिळावा यासाठी  तर विवाहित स्त्रियांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. या निमित्ताने शहरातील परिसरातील हनुमान मंदिरापासून डोक्यावर कळस घेऊन शोभायात्रा काढण्यात आली होती.

 या सणाची सुरुवात शीतला सप्तमीपासून झाली. या काळात दररोज सायंकाळी महिलांनी पारंपरिक वेषभूषा करत गौरीच्या मुखवट्यांचे पुजन करत लोकगीते गात  होळीच्या राखेपासून सोळा पिंड बनवून या पिंडांची कुंकू, काजळ, मेंदीने पूजा केली. गणगौर उत्सवाच्या पहिल्या  दिवशीच ‘सिंजारा’ हा दिवस साजरा झाला. ‘सिंजारा’च्या दिवशी घरात मिष्टान्न करून दुसऱ्या दिवशी म्हणजेच तृतीयेला ‘गौर’ची वाजत गाजत पूजन करून पाठवणी करण्यात आली. येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने गणगौर सण उत्साहात साजरा करण्यात आला. होळीपासून ते गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापर्यत हा सण पारंपरिक पद्धतीने संस्कृतीचे जतन करत पारंपारिक वेशभूषा व दागिने परिधान करून करण्यात आला.

याप्रसंगी दुर्गा मुरके, सरला मुरके, डाॅ.करूणा मुरके, रेखा मुरके,पुष्पा मुंधडा,सोनल मुरके,विणा मुरके, डाॅ.मानसी मुरके, कीर्ती टवानी,डाॅ.आरती काबरा,मीरा पनपालीया, डॉ.आरती काबरा, नम्रता लाहोटी,डाॅ.सुनिता मंत्री,डाॅ.सुषमा राठी, ज्योती जाजू, चंचल जाजू, सारिका हरकुट,सिमा जाजू, वर्षा राठी, समृद्धी मुरके,कंचन मुरके,रेवा मुरके, यांसह मोठ्या संख्येने महिला भगिनी व कन्या उपस्थित होत्या.उद्यापनाच्या स्नेहभोजनाने गणगौर उत्सवाची सांगता करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments