अमरावती, दि.२४: शहीद दिनानिमित्त विभागीय आयुक्तालयात काल विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी भारताचे स्वातंत्र्य सेनानी शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
अपर आयुक्त सुरज वाघमारे, संजय जाधव, उपायुक्त रविंद्र हजारे, संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
Post a Comment
0 Comments