Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अमरावतीत १०० मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारतीची आवश्यकता;


१५ दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन 

अमरावती,दि.१३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे अमरावती येथे विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील १०० विद्यार्थ्यांसाठी नवीन मुलांचे वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. या वसतिगृहासाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी अंदाजे ९२०० चौरस फूट बांधकाम असलेली इमारत भाड्याने हवी असून, इच्छुक इमारत मालकांनी १५ दिवसांच्या आत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सहायक संचालक सरीता बोबडे यांनी केले आहे.

अमरावती शहरातील स्थानिक इच्छुक इमारत मालकांनी विहित नमुन्यातील अर्ज ‘सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती, सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे, चांदूर रेल्वे रोड, अमरावती’ या कार्यालयात सादर करावयाचे आहेत. या कार्यालयाचा ईमेल आयडी adobbwoamravati@gmail.com हा आहे.

बातमी प्रसिद्ध झाल्यापासून पुढील १५ दिवसांपर्यंत कार्यालयीन वेळेत हे अर्ज स्वीकारले जातील. अर्जाचा नमुना आणि इतर सर्व अटी व शर्तींची सविस्तर माहिती वरील कार्यालयात उपलब्ध आहे. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेसाठी हक्काचे निवासस्थान उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रशासनाने ही प्रक्रिया गतिमान केली आहे.


Post a Comment

0 Comments