अमरावती, दि.१३ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, अधीक्षक निलेश खटके यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
Post a Comment
0 Comments