आता रात्री 7.30 वाजेपर्यंत पोस्टाचे व्यवहार करता येणार!
अमरावती, दि.२६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):भारतीय डाक विभागाने अमरावतीकरांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला असून, श्याम चौक येथील प्रधान डाकघराच्या कामकाजाच्या वेळेत मोठी वाढ करण्यात आली आहे. 25 मार्च 2026 पासून आता नागरिकांना रात्री 7.30 वाजेपर्यंत आपली आर्थिक कामे पूर्ण करता येतील. नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची कार्यालयीन वेळेतील अडचण ओळखून डाक सेवा संचालक डॉ. सुधीर जाखरे यांच्या मार्गदर्शनात ही 'नाईट पोस्ट' सुविधा सुरू करण्यात आली आहे.
या विस्तारित वेळेत बचत खात्यातील व्यवहार, नवीन खाते उघडणे आणि पोस्टाच्या सर्व बचत योजनांशी संबंधित कामे होतील. आज प्रवर अधीक्षक गेडाम आणि सुजितकुमार लांडगे यांच्या उपस्थितीत या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. कामावरून घरी परतताना आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
Post a Comment
0 Comments