Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

चिखलदरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 142 उमेदवारांची प्राथमिक निवड





आदिवासी तरुणांनी जागतिक स्तरावर झेप घेण्याचे आमदार केवल कुमार काळे यांचे आवाहन

              अमरावती, दि. २६  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): मेळघाटच्या दुर्गम भागातील तरुणांमध्ये  जिद्द आहे. या तरुणांनी आता केवळ स्थानिक रोजगारावर समाधान न मानता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगारासाठी सज्ज व्हावे. प्रशासकीय यंत्रणा  तुमच्या पाठीशी उभी आहे, असे प्रतिपादन आमदार केवल कुमार काळे यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती आणि सिपना कला व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदरा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच चिखलदरा येथे संपन्न झालेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या प्रसंगी श्री. काळे बोलत होते.

यावेळी सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर,  प्राचार्य डॉ. राजेश जयपूरकर, सुभाष गुल्हाने, प्रा. कान्हू , पंकज कचरे तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

या मेळाव्यात बी.व्ही.जी. इंडिया, नवभारत फर्टिलायझर, सनलाईट सोलर आणि प्रेसिजन मार्चिग यांसारख्या ८ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. एकूण 255 रिक्त पदांसाठी 346 उमेदवारांनी नोंदणी केली. प्रत्यक्ष मुलाखतीनंतर 142 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर 2  उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी आपल्या प्रास्ताविकात धारणी आणि चिखलदरा भागातील उमेदवारांसाठी रोजगार मेळावे घेण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कान्हू  यांनी तर आभार  प्रा. ढगे यांनी मानले.


Post a Comment

0 Comments