बातमी मुळे पत्रकाराचे घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्या ने कारवाई करण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, February 17, 2026

बातमी मुळे पत्रकाराचे घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्या ने कारवाई करण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


चांदूरबाजार , दिनांक १८ ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क (डींगाबर सुने)

        चांदूरबाजार जिल्हा अमरावती येथील पत्रकार तथा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख सागर सवळे यांनी १६ फेब्रुवारी दैनिक देशोन्नतीला १२ वी विद्यार्थ्यांचे शिरसगाव बंड  परीक्षा केंद्र १५ किलोमीटरवर अडगाव ला २ च दिवसात  कसे काय झाले? ही बातमी  प्रकाशित झाली होती या बातमीने चिडून काही विद्यार्थी व पालकानी पत्रकाराचे घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने पत्रकार सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

        बातमी ही कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान व्हावे या हेतूने नव्हती. उलट, गरीब व सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, त्यांना २ किलोमीटर शिरजगाव बंड परीक्षा  केंद्र असताना  १५ किलोमीटर अडगाव चा फटका बसू नये, यासाठीच  ही बाब वृत्तपत्राचे माध्यमातून समाजासमोर मांडली आहे. अडगाव सेंटर संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्यता होती, म्हणूनच ही बातमी प्रकाशित करण्यात आली आहे.

बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी सागर सवळे यांनी संबंधित संस्थेच्या अध्यक्षांना फोनवरून विचारणा केली आहे.अध्यक्षांनाही याची ठोस माहिती नसल्याने त्यांनी बोर्डातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनाही स्पष्ट माहिती नसल्यामुळे सखोल चौकशी करण्यात यावी असा बातमीचा आशय असल्याने व.अडगाव येथील १२ वी परीक्षा केंद्र सेंटरबाबत वस्तुस्थिती समाजासमोर आणणे हा पत्रकाराचा कर्तव्यभाग आहे.  प्रकाशित  केलेली बातमी

याच अनुषंगाने आहे. प्रश्न हाहि उपस्थित होतो की, अनेक शाळा मधील काही विद्यार्थ्यांना साधे १० मार्कांचे उत्तर लिहिता येत नाही. तर का? शाळांमध्ये प्रॅक्टिकलमध्ये पूर्ण मार्क्स दिले जात असताना प्रत्यक्ष ज्ञानात तफावत का दिसते  या प्रश्नांवर विचार होणे गरजेचे आहे.

मात्र, या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांनी आणि काही पालकांनी पत्रकाराच्या घरावर जाऊन अश्लील शिवीगाळ करणे, दबाव टाकणे हे अत्यंत चुकीचे व निषेधार्ह आहे.   सत्य मांडणाऱ्या पत्रकाराचे घरावर वैयक्तिक हल्ला करणे ही लोकशाहीला न शोभणारी कृती आहे.

पत्रकाराने समाजहितासाठी, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आवाज उठवला आहे,  त्याला धमकावणे ही बाब गंभीर आहे.  बातमीच्या विषयाची वस्तुनिष्ठ चौकशी करणे आवश्यक आहे. याबाबत तातडीने चौकशीचे आदेश देण्यात यावे, व राज्यातील पत्रकार कसे सुरक्षित राहतील या दृष्टीने संबंधित पोलीस विभागाला आदेश द्यावे अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणीस यांना ई-मेल पाठवून केली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages