Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

वडकीत स्मॉल वंडर्स स्मॉल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांना घडवण्याची संधी - कांचनताई मुरके


राळेगाव : दिनांक १९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
शाळेतील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाकडे केवळ मनोरंजन म्हणून न पहाता मुलांच्या कलागुणांना समोर आणून त्यांना घडवण्याची एक संधी’ म्हणून बघायला हवे, असे वक्तव्य कांचनताई मुरके यांनी स्मॉल वंडच्या वतीने आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सांगितले आहे. पुढे बोलतांना त्यांनी दरवर्षी स्माॅल वंडर्स स्कूल विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या कलागुणांना विकसित करण्यासाठी व त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असतात याचं संपूर्ण श्रेय शाळेच्या प्राचार्य डॉ. मंजुषा सागर यांना जाते त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीचं, नृत्य अभिनय कथा भाषणे संवाद सुंदर हस्ताक्षर चित्रकला अशा विविध स्पर्धांमधून त्यांनी विद्यार्थ्यांच्या आत दडलेल्या कलेला प्रोत्साहन दिले आहे. शिक्षणासह प्रत्येक विद्यार्थ्यांमधे केलेल्या कलेला बाहेर आणून त्यांना मार्गदर्शन करत त्याचा सराव घेणे हे फार म  महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
त्या वडकी राळेगाव येथील स्मॉल वंडर्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वडकी (जि. यवतमाळ) येथील वार्षिक स्नेहसंमेलनात निमंत्रित प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
 स्नेहसंमेलनामाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या उद्घाटिका. शकुंतला डी. सागर (सचिव, अश्वरोही ग्रामीण व बहुउद्देशीय संस्था, नागपूर) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव बोरखडे साहेब,उपाध्यक्ष गंभीररावजी भोयर (सदस्य, अश्वरोही ग्रामीण व बहुउद्देशीय संस्था, नागपूर) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, एकांकिका व विविध सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारा हा कार्यक्रम ठरला आहे.
 समाजसेविका विद्यताई लाड, ग्रामगीताचार्य कृष्णाजी माकोडे यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तसेचं
डॉ. प्रेमदास कांबळे (DHMS) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून शिक्षणासोबत संस्कार व कला विकासाचे महत्त्व विशद केले आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनात बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून  लेखिका व पत्रकार कांचन मुरके मॅडम (अमरावती ) यांनी आपली उपस्थिती लावून विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मानीत करण्यात आला आहे.
कार्यक्रमात पालक, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवर्ग अहमद शेख, शंकर मालखेडे, विजय फुलकर, नितीन गवळी, प्रेमकुमार इंगोले, वैभव करडे, अक्षय वानखेडे, शनो शेख, नीता फुटाणे, रुबीना शेख, कल्पना दाते, सीमा झोटिंग, कोयल मुरके, रंजना आवारी व विद्यार्थी आणि पालक वर्गाने विशेष योगदान दिले.
स्नेहसंमेलन संयोजन व नियोजन प्राचार्या डॉ. मंजुषा डी. सागर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

Post a Comment

0 Comments