भरधाव क्रूझरने उडवली वाहने; बहिरम मार्गावर वाहतूक ठप्प
दि.१९ अचलपूर / प्रतिनिधी :-
प्रसिद्ध बहिरम यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, काल १८ जानेवारी रोजी बहिरम ते सर्फापूर मार्गावर एका भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या एका क्रूझर गाडीने दोन ते तीन चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात २ ते ३ जण जखमी झाले असून मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती.

काल रविवार असल्याने बहिरम यात्रेसाठी भाविकांची प्रचंड मांदियाळी होती. या मार्गावर दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर आणि जड वाहनांची मोठी वर्दळ सुरू होती. अशातच एका भरधाव क्रूझर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोर असलेल्या वाहनांना पाठीमागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले असून, अपघातग्रस्त वाहने हटवण्याचे काम सुरू आहे.
Post a Comment
0 Comments