जालना/ दिनांक १९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केल्याच्या स्मरणार्थ अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे दर्पण दिन 10 जानेवारी 2026 रोजी साजरा करण्यात आला. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश संघटक विकासकुमार बागडी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार बाबुराव व्यवहारे तर प्रमुख पाहूणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता तुलजेस भैय्या चौधरी हे होते. तर व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार विनायक दहातोंडे, विलास खानापुरे, मंठ्याचे बाबुजी तिवारी, संपादक अर्पण गोयल, पारसनंद यादव , अहेमद नुर, श्रीकिशन झंवर, लियाकत अली खान, परतुरचे एल.एम. कुरेशी, साईनाथ चिन्नादोरे, अॅड. महेश धन्नावत, जेष्ठ डिटीपी ऑपरेटर मधुकर मुळे, जेष्ठ मशिन चालक शेख शफीभाई आदि होते.
यावेळी तुलजेसभैय्या चौधरी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी मोलाचं कार्य केलं असं ते म्हणाले. आपल्या लेखणीतून वास्तव घटनांचं अचूक चित्रण करणं आणि समाजातल्या अनैतिक, अन्यायी प्रवृत्तीवर प्रहार करणार्या पत्रकारितेचा वारसा आपल्या देशाला लाभला आहे असे ते म्हणाले.
यावेळी पत्रकार बद्री उपरे, मनिष तिवारी, अजयअण्णा देशपांडे, सांडु तातडे, सरफराज नाईकवाडे, सय्यद महेबुब, लक्ष्मीचंद जांगडे, कादरी हुसेन, विजय जाधव, धनंजय देशमुख, अंकुश गायकवाड, कृष्णा पठाडे, हिरालाल पिपरिये, इसाक कुरेशी, शेख इलियास अब्बास, दर्पण सकलेचा, आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आशिष रसाळ यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सुयोग खर्डेकर, विकास काळे, देवचंद सावरे, आकाश माने, राजेश गौड, युवराज कुरील, गौतम वाघमारे, विजय वैष्णव, नटवर किल्लेदार, मितवा रामरख्या यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment
0 Comments