रस्ते अपघातग्रस्तांना मदत करा,
5 हजार रुपयांचे बक्षीस मिळवाः
गुड समारिटन कायदा समजून घ्या आणि जीव वाचवा
भारताच्या रस्त्यांवर दरवर्षी 1.5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो म्हणजे दर २ मिनिटाला १ मृत्यू, तर महाराष्ट्रात हे आकडे 13 हजारपेक्षा जास्त आहेत. हे आकडे केवळ संख्या नसून कुटुंबांना आणि समाजाला होणाऱ्या मोठ्या मानवी, आर्थिक आणि सामाजिक नुकसानीचे दुर्दैवी प्रतीक आहे. या मृत्यूंपैकी अनेक टाळता येऊ शकतात, जर अपघातानंतर गोल्डन अवर (पहिला तास) मध्ये त्वरित मदत मिळाली तर ! या तासात मिळालेली तात्काळ वैद्यकीय मदत जीव वाचवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते.
अनेक अपघातांच्या वेळी गोल्डन अवरमध्ये त्वरित मदत न मिळाल्यामुळे 50% पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. त्वरित दिलेल्या प्राथमिक उपचारामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते आणि जखमांचे गांभीर्यही कमी होऊ शकते. परंतु, अनेक लोक कायदेशीर त्रास होईल . या भीतीने मदत करण्यास टाळाटाळ करतात. याच ठिकाणी गुड समारिटन कायदा मदतीसाठी पुढे येणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी लागू करण्यात आला आहे. हा कायदा लोकांना मदतीसाठी प्रोत्साहित करतो, ज्यामुळे कोणत्याही कायदेशीर किंवा वित्तीय अडचणींशिवाय रस्ते अपघातग्रस्तांना तातडीने मदत करता येईल.
गुड समारिटन कायदा काय आहे?
गुड समारिटन कायदा 21 जानेवारी 2016 रोजी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लागू केला . सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लागू झालेल्या या कायद्याने मदत करणाऱ्यांना कायदेशीर संरक्षण दिले आहे. कोणत्याही अपघातग्रस्ताला मदत करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर त्रासातून संरक्षण दिले जाते, आणि त्यांना कोणतेही वैद्यकीय खर्च किंवा इतर जबाबदारी सोसावी लागणार नाही.
गुड समारिटन कायद्याचे मुख्य मुद्देः
1. कायदेशीर त्रासापासून संरक्षणः
जर तुम्ही अपघातग्रस्ताला मदत केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर त्रासातून संरक्षण दिले जाते. तुम्हाला तुमचे नाव किंवा इतर कोणतीही माहिती सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तपासात सहभागी होऊ इच्छित नसल्यास, तुम्ही तात्काळ रुग्णालय किंवा घटनास्थळ सोडू शकता.
2. साक्षीदार होण्याची सक्ती नाहीः
जर तुम्ही मदत केली आणि आपली माहिती दिली, तरीही तुम्हाला साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. साक्षीदार होणे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे.
3. मेडिकल खर्चाची जबाबदारी नाही.
गुड समारिटन म्हणून मदत करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी सोसावी लागणार नाही. आपली जबाबदारी रुग्णाला रुग्णालयात नेण्यापर्यंतच असते.
4. सन्मानजनक वागणूकः
गुड समारिटनला कोणत्याही प्रकारच्या धर्म, जाती, लिंग किंवा राष्ट्रीयतेच्या आधारे भेदभाव न करता सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल.
5. साक्ष देण्याची सोयः
जर तुम्ही साक्षीदार होण्याचा निर्णय घेतला, तर तुमच्या सोयीच्या ठिकाणी आणि वेळी तुम्हाला साक्ष
देण्याची संधी दिली जाईल. तपास अधिकारी सामान्य कपड्यांत असतील आणि तपास वेळीच पूर्ण होईल. तुम्हाला तुमचे म्हणणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही नोंदवता येईल.
5 हजार रुपयांचे बक्षीस गुड समारिटनसाठी :
रस्त्यावरील दुर्घटना पीडितांना मदत करण्यासाठी, केंद्र सरकारची गुड समारिटन योजना तुम्हाला प्रत्येक मदतीसाठी 5 हजार रुपयांचे नगद बक्षीस व प्रमाणपत्र देते.
5 हजार रुपयांचे बक्षीस कसे मिळवावेः
1. अधिकाऱ्यांना सूचित कराः अपघातानंतर मदत केल्यानंतर पोलिस किंवा वाहतूक अधिकाऱ्यांना सूचित करा.
2. पुरावे द्याः तुम्ही केलेल्या मदतीचे पुरावे, जसे रुग्णालयाच्या कागदपत्रांचा किवा डॉक्टरांचा दाखला द्या.
3. आवश्यक फॉर्म भराः अर्ज भरून संबंधित पोलीस विभागात सादर करा.
4. बक्षीस मिळवाः सत्यापन झाल्यानंतर तुम्हाला नगद बक्षीस पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळेल.
रस्ता सुरक्षा नियमः
काय करावे:
1. सुरक्षा सुनिश्चित कराः हस्तक्षेप करण्यापूर्वी दृश्याचे मूल्यमापन करा.
2. आपात सेवा कॉल कराः त्वरित अधिकाऱ्यांना कळवा.
3. प्राथमिक उपचार द्याः आपण प्रशिक्षित असल्यास मदत करा.
4. शांत रहाः प्रभावी मदतीसाठी स्थिरता राखा.
5. पीडिताची गोपनीयता राखाः त्यांच्या मानाच्या बाबतीत विचार करा.
काय करू नयेः
1. घाबरू नकाः योग्य निर्णय घेण्यासाठी शांत रहा.
2. पीडिताला अनावश्यक हलवू नका.
3. नैदानिक मूल्यांकन करू नकाः वैद्यकीय मूल्यांकन करण्यापेक्षा मदत करण्यावर लक्ष केंद्रित करा.
4. पेशेवरांमध्ये हस्तक्षेप करू नकाः आपात सेवा प्रदात्यांना नियंत्रण घेऊ द्या.
5. मदतीसाठी संकोच करू नकाः कोणी गरजेत असल्यानंतर तात्काळ कृती करा.
गुड समारिटन कायदा आपल्याला कायदेशीर संरक्षण देतो आणि आपल्याला रस्ते अपघातग्रस्तांना मदत करण्याचे स्वातंत्र्य मिळवून देतो. 5 हजार रुपयांचे बक्षीस आणि कोणाचे तरी जीवन वाचवण्याची संधी ही खरोखरच महत्त्वाची आहे. तुमची जलद कृती कोणाचातरी जीव वाचवू शकते मदतीसाठी पुढे या, जीव वाचवा, आणि समाजात सकारात्मक बदल घडवा !
Post a Comment
0 Comments