Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

६ जानेवारी, पत्रकार दिन विशेष...




दि. ६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):-

पत्रकारांची अपूर्ण कहाणी...!

दुनिया मे कितना गम है,मेरा गम कितना कम है...याप्रमाणे आपले दुःख बाजूला सारून इतरांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या इतरांच्या दुःखाला लेखणीबद्ध करून त्यावर कारवाही करायला भाग पाडणाऱ्या वेळोवेळी प्रशासनाला जागे करणाऱ्या पत्रकार बांधवांचा आज  पत्रकार दिन म्हणून साजरा होतोय.मराठी पत्रकारितेचा वारसा देणारे बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श जोपासला जातोयं. 'दर्पण' वृत्तपत्रातून (१८३२) सुरू झालेली मराठी पत्रकारिता समाज प्रबोधन आणि जनजागृतीचे माध्यम बनली.

पत्रकारिता हा सर्वात धोकादायक व्यवसाय आहे. जर एखादा पत्रकार खोटे लिहितो तर तो जनतेच्या मनातून उतरतो, आणि जर तो खरे लिहितो तर त्याला धनदांडगे संपविण्याचा प्रयत्न करते कटू वास्तव.पत्रकाराचे दुःख त्यांच्या सुरक्षेचा अभाव, मानसिक ताण, आर्थिक असुरक्षितता आणि समाज आणि व्यवस्थेशी सतत संघर्ष यात असते, जिथे त्यांना सत्य वृत्तांकन केल्याबद्दल धमक्या येतात, कमी वेतनावर अनियमित तास काम करावे लागते,पत्रकारांचा जीवन संघर्ष म्हणजे समाजाला दिशा देणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि सत्य समोर आणणे, ज्यात त्यांना आर्थिक अडचणी, वाढती स्पर्धा, माध्यमांमधील बदल , आणि अनेकदा धमक्यांचा सामना करावा लागतो. खरे पाहता पत्रकारितेचे देखील गट पडलेत 'अ' गटातला पत्रकार मोठ्या स्टार लोकांना उजेडात आणतो तर कधी एखाद्या एखादी अभिनेत्री मद्य धुंद अवस्थेत कसे वस्त्र परिधान करून होती यावर प्रकाश टाकतो 'बी' ग्रेडचा पत्रकार सर्व स्तरातील बातम्या मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि सिगरेटचा म्हणजे आमचा ग्रामीण पत्रकार वन वन भटकून सामान्यांचा आवाज बनतो आणि त्याचा आवाज कधी पोहोचतो तर कधी संकटाने त्याचाच आवाज बंद होतो. पत्रकारिता विकली गेली आहे असे वाक्य कानी पडताच काळीज फाटायला होतयं. पत्रकार समाजातील विसंगती, भ्रष्टाचार आणि अन्यायावर प्रकाश टाकतात, ज्यामुळे त्यांच्यावर अनेकदा दबाव येतो. पत्रकारितेत स्थैर्य मिळवणे आणि टिकवणे कठीण असते. कमी वेतनात काम करणे, नोकरीची अनिश्चितता आणि वाढत्या महागाईत पत्रकार संघर्ष करतात.सोशल मीडियाच्या युगात प्रिंट मीडियाला इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या स्पर्धेत टिकून राहणे हे मोठे आव्हान आज त्यांच्यासमोर आहे.सत्य वार्तांकन केल्यामुळे पत्रकारांना धमक्या मिळतात, ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. यातून त्यांना मानसिक आणि शारीरिक संघर्ष करावा लागतो. पदवी घेऊन आवडीने पत्रकारिता करत लेखन करणे, सखोल अभ्यास करणे सोपे परंतु उदरनिर्वाहासाठी पत्रकारितेचा वसा घेऊन चालणे ही तारेवरची कसरतचं.

आजही अनेक पत्रकार, विशेषतः ग्रामीण भागातील, कमी साधनांमध्ये काम करत समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत, असे अनेक लेख आणि वृत्तांतून दिसून येते. 

पत्रकारितेतील संघर्ष आव्हानात्मक असला तरी, समाजाच्या प्रगतीसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी महिला प्रथम पत्रकार तानुबाई बिर्जे यांनी आपलं नाव इतिहासाच्या पानावर कोरलंय. पत्रकारितेत महिलांची संख्या कमी असली तरी माझ्या भगिनी देखील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य कर्तुत्व गाजवत आहे.तरी देखील त्यांची कहाणी मात्र अधुरीच आहे .पत्रकारांची अधुरी कहाणी" म्हणजे पत्रकारांच्या आयुष्यातील अनेक अपूर्ण राहिलेल्या, अपूर्ण राहिलेल्या कथा किंवा त्यांच्या कामातील आव्हाने आणि त्यागावर आधारित असू आहे, ज्यात त्यांची सचोटी, धोका, समाजासाठी असलेले योगदान आणि अनेकदा त्यांना मिळणारी अपुरी ओळख यांचा समावेश असतो.सत्य उघडकीस आणण्याच्या संघर्षाची, कधी होणाऱ्या धोक्यांची, तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील त्यागांची कहाणी आहे. 

अनेक महिने किंवा वर्षे चालणारे संशोधन आणि त्यातून उघडकीस आलेली रहस्ये, प्रकरण,किंवा स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांची दैनंदिन जीवन संघर्षांची कहाणी, जिथे त्यांना अनेक विषयांवर रिपोर्टिंग करावी लागते.कमी संसाधने,सचोटी, दबाव आणि भीती यांच्यात काम करताना पत्रकारांना येणाऱ्या अडचणी, स्विकारलेली जोखीम,बातमीसाठी पत्करलेले धोके अशा अनेक गोष्टी पत्रकाराच्या पुढे असतात. इतिहासापासून ते आजच्या सोशल मीडिया युगापर्यंत, माहिती गोळा करणे आणि प्रसारित करण्याची ही कहाणी केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून, त्यामागे  त्यांचे परिश्रम, त्यांचे बलिदान आणि अपूर्ण राहिलेल्या कथा यांचा एक मोठा अपूर्ण पट आहे हे निश्चित.


कंचन मुरके, अमरावती

Post a Comment

0 Comments