सीताफळांचा हर्रास न झाल्याने फटका
जिल्हा परिषदेस लाखोंचा फटका
चांदूर बाजार, ९ ऑक्टोबर:
तालुक्यातील कारंजा बहिरम येथील सीताफळाच्या वनाचा योग्य वेळी लिलाव न झाल्याने जिल्हा परिषदेला लाखो रुपयांचा फटका बसला असून, यावरून पंचायत समिती अधिकाऱ्यांची योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता शून्य असल्याचे दिसून येत आहे
कारंजा बहिरम हा परिसर सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. दरवर्षी या सीताफळाच्या वनापासून जिल्हा परिषदेला लाखो रुपयाचे उत्पन्न मिळत होते. मागील वर्षी देखील तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न या सीताफळाच्या वनाच्या लिलावापासून मिळाले होते. सप्टेंबर महिन्यापासून सीताफळाचा हंगाम सुरू होत असतो. सीताफळे नाशवंत असल्यामुळे झाडावर पिकून गळून जात असतात यासाठी या सीताफळांचा लवकरच लिलाव होणे आवश्यक असते. यासाठी तालुक्यातील काही व्यापारी या सीताफळ बनाचा लीलाव घेण्याकरिता तयार होते.मात्र पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे या वनाचा आतापर्यंत तीनदा लिलाव घेण्यात आला.पण असे असताना सुद्धा अधिकाऱ्यांनी समयसूचकता न दाखवल्यामुळे जिल्हा परिषदेता मोठ्या उत्पन्नापासून मुकावे लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या चर्चेमधून व्यक्त होत आहे.
यावर्षी फळाचे चांगले पीक असून, चांगले भाव देखील आहे. असे असताना देखील योग्य वेळेस निर्णय न घेणाऱ्या अधिका-यांच्या चुकीमुळे जिल्हा परिषदेचे लाखो रुपयाचे उत्पन्न बुडाले आहे. याला दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कोणती कारवाई होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी विषय समिती सभापती मनोहर सुने यांनी सांगितले की, लाखो रुपये उत्पन्न देणाऱ्या या सीताफळ बनाचा हर्रास करण्याकडे कोणत्याही अधिकाऱ्याने लक्ष दिले नाही.योग्य वेळी, योग्य निर्णय घेण्याची क्षमता गटविकास अधिकाऱ्याकडे नसल्यामुळे, लाखो रुपयांच्या उत्पन्नापासून जिल्हा परिषद मुकली आहे. संबंधितांची चौकशी करण्याची गरज आहे. सदर लीलावाबाबत चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी.
या सिताफळ बनाचा लीलाव वेळेवर न झाल्याने याचा फायदा
योगेश पवार माजी उपसभापती, पंचायत समिती. म्हणाले की,
सीताफळ वनाकडे योग्य वेळी कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष न दिल्यानेच हे नुकसान झाले आहे.काही चोरट्यांनी घेऊन तर काही फळे निसर्गाच्या कृपेने गळून पडली. त्यामुळे प्रत्येक लीलावाच्या वेळी बोलीमध्ये घट होत होती. यावर्षी फळाचे चांगले पीक असून, चांगला भाव देखील आहे. असे असताना योग्य वेळेस निर्णय नघेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जिल्हा परिषदेचे लाखो रुपयांचे उत्पन बुडाले आहे. याला दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कोणती कारवाई होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
0 Comments