Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

दिव्यांग मुलांसाठी सोमवारी विशेष निदान शिबिर


अमरावती, दि. 4 (ग्रामीण उदय प्रतिनिधी):
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये 0 ते 18 वयोगटातील दिव्यांग मुलांसाठी सोमवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष दिव्यांगत्व निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. न्याय समिती, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात शारीरिक आणि बौद्धिक विकासात्मक दिव्यांगत्व असलेल्या मुलांची तपासणी करून त्यांना युनिक डिसअ‍ॅबिलिटी आयडी कार्ड वितरित केले जाणार आहे. या कार्डमुळे दिव्यांग व्यक्तींना विविध सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ घेता येणार आहे. शिबिरात येण्यापूर्वी संबंधित बालकाची ऑनलाईन अर्ज भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. शिबिरात येताना आधार कार्ड आणि इतर वैद्यकीय कागदपत्रे सोबत आणावीत. या शिबिरात दिव्यांग मुलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देखील जाणार आहे.

शिबिरापासून गरजू आणि पात्र बालक वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित अंगणवाडी सेविका आणि विशेष शिक्षिकांनी घ्यावी, तसेच या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. एस. वमने यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments