* नोंदणीसाठी ६ नोव्हेंबर अंतिम मुदत
अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ यांच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. यासाठी १ नोव्हेंबर २०२५ ही यासाठी अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघांसाठी हा कार्यक्रम राहणार आहे.
मतदार नोंदणीसाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने दि. ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नमुना १९ मध्ये आपला अर्ज सादर करावा. यासाठी मतदार नोंदणी नियम, १९६० च्या नियम ३१ (४) नुसार प्रसिद्ध केलेल्या नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी करण्यात येत आहे. सदर नोटीस जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, सर्व पंचायत समिती, सर्व नगर परिषद कार्यालयांच्या नोटीस बोर्ड आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यासंबंधीचा सर्व तपशील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आणि विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या amravatidivision.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
Post a Comment
0 Comments