Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जिल्ह्यातील २५ शासकीय केंद्रांवर अल्पकालीन अभ्यासक्रम सुरु;


त्वरित ऑनलाईन प्रवेश नोंदणी करा

            अमरावती, दि. 03 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): राज्यात 'उद्योग 4.0' च्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तरुणांना रोजगाराभिमुख बनवण्यासाठी उपक्रम सुरू झाला आहे.  या अंतर्गंत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), शासकीय तंत्र माध्यमिक शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नवीन आणि लोकप्रिय अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.यानुसार, अमरावती जिल्ह्यात दिनांक 8 ऑक्टोबर 2025 पासून या 'न्यू एज' अभ्यासक्रमांना सुरुवात होत आहे.

अमरावतीतील 25 संस्था सज्ज औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या उद्देशाने, अमरावती जिल्ह्यातील एकूण 25 शासकीय संस्थांमधून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये 18 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि 7 शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्रांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांमुळे संबंधित क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राशी सुसंगत कौशल्ये विद्यार्थ्यांना प्राप्त करता येतील.इच्छुक उमेदवारांना या अल्पकालीन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावी लागणार आहे.उमेदवारांनी सर्वप्रथम www.msbsvet.edu.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. वेबसाईटवरील 'ITI शॉर्ट टर्म ट्रेनिंग' या टॅबवर जाऊन आपला प्रवेश त्वरित नोंदवावा.

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. टी. मुळे यांनी या अल्पकालीन आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची मागणी मोठी असल्याने, सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळेत प्रवेशाची नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील संबंधित प्रशिक्षण केंद्रांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


Post a Comment

0 Comments