Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI विकसित




चुकीच्या खतांचा वापर टळणार; डिजिटल क्रांतीमुळे नफा वाढणार

            अमरावती, दि. 03 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून कृषी विभागाने महाविस्तार AI हे अँप विकसित केले आहे. हे एक अत्याधुनिक अॅंप आहे. कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने हे अॅप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अॅंप शेतक-यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पध्दतींचे मार्गदर्शन करते.

महाविस्तार AI अॅंपमधील AI चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देते. रिअल टाइम हवामान अंदाज स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल टाइममध्ये दाखवते. कृषि विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती. अनुदान, आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळू शकतील. अॅंपमध्ये मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत. ज्यात पिकांची लागवड, खतांचा वापर कापणी, आणि जैविक शेती याबाबत तपशीलवार मार्गदर्शन मिळेल. अॅंपमधील AI तंत्रज्ञानमध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करून उपाय मिळवू शकतात.

महाविस्तार AI अॅंप शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी अनेक फायदे घेऊन आले आहे. चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची विक्री आणि नियोजन करू शकतात. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार AI अँप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल कांतीचा भाग व्हा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments