Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

वसतिगृह प्रवेशासाठी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


*इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 26 ऑक्टोबर अंतिम मुदत

अमरावती, दि. 03 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शासनाच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यांचा लाभ घेण्याची संधी आहे. बारावीनंतरच्या बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय वसतिगृहांमध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत राहील. अर्जांची छाननी 27 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान होईल, तर पहिली निवड यादी 31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. पहिल्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत 10 नोव्हेंबर असून, रिक्त जागांवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड करून ही यादी 13 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 20 नोव्हेंबर 2025 असेल. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मुलांनी (अग्रवाल टॉवर जवळ, कॉटन मार्केट रोड) आणि मुलींनी (राम लक्ष्मण संकुल, रामपूरी कॅम्प जवळ) संबंधित शासकीय वसतिगृहांमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. अधिक माहितीसाठी सहायक संचालक गजेंद्र मालठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण ,अमरावती विभागाने केले आहे.


Post a Comment

0 Comments