Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

ई-आर-1 विवरणपत्र ऑनलाइन सादर करा;


अमरावती जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे आवाहन

अमरावती दि. 03 (ग्रामीण उदय प्रतिनिधी):  खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 ऑनलाइन पद्धतीने सादर करावे, असे आवाहन अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाने केले आहे.

अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत देण्यात येणाऱ्या योजना विषयक सर्व सेवा आता ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योग आणि आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणे) कायद्यान्वये त्रैमासिक ई-आर-1 ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे.

सप्टेंबर 2025 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक कालावधीकरिता ई-आर-1 ची प्रणाली माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय,निमशासकीय,खाजगी उद्योजक,आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून ऑनलाइन सादर करण्याची  आहे. तसेच, त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावयाचे आहे.

ऑनलाइन ई-आर-1 सादर करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा. यासाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0721-2566066 उपलब्ध आहे. ई-आर-1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2025 आहे. या मुदतीत ई-आर-1 ऑनलाइन सादर न करणाऱ्या आस्थापनांवर विहित नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments