इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 29 सप्टेंबरपर्यंत मुदत
अमरावती दि. 23 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसतिगृह योजनेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना' आणि 'पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना' यांचा लाभ घेण्यासाठी 29 सप्टेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बारावीनंतरच्या बिगर व्यावसायिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, अग्रवाल टॉवर, जाफरीन प्लॉट, आदर्श हॉटेल जवळ, कॉटन मार्केट रोड, अमरावती येथे मुलांनी अर्ज सादर करावे. तर मुलींनी इतर मागास बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतिगृह, ब्लॉक A, राम लक्ष्मण संकुल, तिसरा मजला, रामपूरी कॅम्प जवळ, विलास नगर चौक, अमरावती येथे अर्ज सादर करावे.
यासाठी अर्ज करण्याची मुदत: 19 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर,अर्जांची छाननी: 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर, पहिली निवड यादी: 6 ऑक्टोबर, पहिल्या यादीतील प्रवेशाची अंतिम मुदत: 16 ऑक्टोबर, दुसरी प्रतीक्षा यादी: 17 ऑक्टोबर, : 31 ऑक्टोबर राहील, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी इतर मागास बहुजन कल्याण, सहायक संचालक गजेंद्र मालठाणे यांच्याशी संपर्क साधावा. कार्यालयाचा पत्ता सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालयाच्या मागे, चांदूर रेल्वे रोड, अमरावती असा आहे. ई-मेल आयडी dobbwoamravati@gmail.com आहे.
0000000
Post a Comment
0 Comments