Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्ज 2025-26 साठी पोर्टल सुरू

अमरावती,दि. 23 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शिष्यवृत्ती मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल कार्यान्वित झाले आहे. सामाजिक न्याय आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागांमार्फत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

महाडीबीटी पोर्टलवर नवीन तसेच नूतनीकरणाचे अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरणे आवश्यक आहे.

या शिष्यवृत्ती योजनांमध्ये भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी आणि परीक्षा फी योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना या योजनांचा समावेश आहे.

सहायक संचालक गजेंद्र मालठाणे यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत याची खात्री करण्याचे आवाहन महाविद्यालयांच्या प्राचार्यांना केले आहे.


Post a Comment

0 Comments