Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शासकीय तंत्रनिकेतन येथे अभियंता दिन साजरा

 



अमरावती, दि. 23 (ग्रामीण उदय प्रतिनिधी)
: शासकीय तंत्रनिकेतन, अमरवती येथे नुकताच अभियंता दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे प्राचार्य, डॉ.अ.भा. बोराडे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता तुषार काळे, महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे आदी यावेळी उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेतील विद्यार्थी दक्ष वाघमारे, आनंदी शेळके यांनी केले. संस्थेचे प्राचार्य तसेच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अभियंता दिनानिमित्त मार्गदर्शन केले.  विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार श्रावणी निघोंट यांनी मानले.


Post a Comment

0 Comments