अचलपूर, दिनांक ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर भारताचे पंतप्रधान राष्ट्रनेता श्री .नरेंद्रजी मोदी यांचे जन्म दिवस पासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी जन्मदिवसा पर्यंत भारतीय जनता पार्टी सेवा कार्यक्रम घोषित करण्यात आलेले आहे. त्यानिमित्ताने पंधरवाडा कार्यशाळेचे अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार मा.प्रभुदासजी भिलावेकर उपस्थित होते. कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव मा. जयंतजी डेहनकर, प्रमुख उपस्थिती मेळघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय केवलरामजी काळे, जिल्हा महामंत्री सुधीरजी रसे, सौ. नयनाताई जोशी, सदाशिवजी खडके, गोपालजी चंदन , अभय माथने ,अक्षराताई लहाने, मनोहर सुने , गोपाल तीरमारे, माधव अवघड, नारायण बोरेकर उपस्थित होते.
या कार्यशाळेत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा विविध सेवा उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जयंतजी डेहनकर यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये शामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाल शर्मा यांचे योगदानाला विसरता येणार नाही. तसेच इतर विषयावर कार्यकर्त्यांना प्रबोधन केले आहे.या सेवा पंधरवाडा उपक्रमांमधून लोकांना थेट सेवा मिळणार आहे.
कार्यशाळा मध्ये जिल्हा महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. बैठकीस सेवा पंधरवाडा जिल्हा संयोजक डॉ. विलास जी कविटकर, सहसंयोजक सुनील जी खानझोडे,श्यामजी गंगराळे ,जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, जिल्हा मोर्चाचे सर्व अध्यक्ष, मंडळाचे सर्व अध्यक्ष व सर्व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments