Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

समृद्धी महामार्गावर खिळ्यांचा षड्यंत्र ? दौलताबाद परिसरात वाहतूक ठप्प .


समृद्धी महामार्ग दौलताबाद : शंभराहून अधिक खिळ्यांमुळे वाहनांची पंक्चरांची रांग, महामार्गावर चक्काजाम"

 शिरजगाव कसबा विद्या दाभाडे  दि. १० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

 दौलताबाद : समृद्धी महामार्गावरील  दौलताबाद परिसरात शंभराहून अधिक खिळे ठोकल्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होऊन वाहतूक  ठप्प  झाली आणि मोठ्या प्रमाणावर चक्काजाम झाल्याची घटना उघडीस आली आहे. दौलताबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत मध्यरात्री हजारो  खिळे महामार्गाच्या मध्यभागी ठोकण्यात आले होते.

महामार्गावरुन रात्री जालना वरून पनवेल ला  तसेच नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक वाहनांची टायर पंक्चर झाली. वाहन चालक आणि प्रवाशांना या त्रासामुळे तासभर महामार्गावर अडकण भाग पडले संपूर्ण रस्ता चक्काजाम असून  नागरिक त्रस्त झाले . तक्रार करूनही  पोलीस या मध्ये काहीही मदत करत नाही आहेत. हा मार्ग  वाहतुकीसाठी बनला आहे की, लोकांच्या जीव घेण्यासाठी असे नागरिक तक्रार  करत आहेत.  

प्रथमदर्शनी हे खिळे चोरट्यांनी  चोरी किंवा लुट करण्याच्या  उद्देशाने  ठोकले असावेत. अशी शंका होती.  नंतर पडताळणी अंती रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीनेच हि खिळे पुलाच्या कामासाठी ठोकल्याचे समोर आले आहे. कामासाठी खिळे ठोकतांना  पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. सार्वजनिक संतापाची भावना व्यक्त होत असून काम करणाऱ्या कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी वाढली आहे. 

 हि घटना उपयुक्त वाहतूक सुरक्षेसाठी गंभीर बाब असल्याने प्रशासनाकडून चौकशी आणि जबाबदारांवर  कार्यवाही होण्याची अपेक्षा नागरिकांनी दर्शवली आहे. 
 

Post a Comment

0 Comments