Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा आज दौरा


अमरावती, दि. 11 (ग्रामीण उदय प्रतिनिधी ) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे आज गुरूवार, दि. 11 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, गुरूवार, दि. 11 सप्टेंबर रोजी 3 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील मिशनच्या कार्यालयात शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवड यासंबंधी चर्चा करतील. दुपारी 3.30 वाजता धानोरा कोकाटे, ता. अमरावती येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियास भेट देतील. सायंकाळी 4.30 वाजता पोहरा पूर्ण, ता. भातकुली येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियास भेट देतील. त्यानंतर सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.


Post a Comment

0 Comments