पत्रकारांवरील हल्ल्याचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने केला तीव्र निषेध - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, September 22, 2025

पत्रकारांवरील हल्ल्याचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने केला तीव्र निषेध

 



बीड दि. २३ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : त्र्यंबकेश्वर येथे वार्ताकनासाठी गेलेल्या Zee २४ तासचे ब्युरो चिफ योगेश खरे, साम  टीव्ही चे ब्युरो चिफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूज चे ब्युरो चिफ किरण ताजने या तिघा पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राराजवळील पार्किंग वर काम करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचार्यांनी एकामागोमाग एक दगड, लाथा-बुक्क्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अपोला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले हे दिवसेंदिवस वाढत चालले असून अशा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी. असे केल्यास, भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष अशोक होळकर यांनी पत्रकारा द्वारे केली आहे. 

 पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. जर हा आरसाच सुरक्षित नसेल, तर समाजाला सत्य दिसणार नाही. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने तातडीने योग्य ती पावले उचलावीत,गंभीर प्रकरणांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना आवश्यक ती सुरक्षा पुरवावी. पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितपणे काम करता यावे यासाठी पत्रकार संरक्षण कायदा लागू करा 

पत्रकार समाजातील चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण गेल्या काही वर्षांपासून पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. तर या महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. या घडलेल्या प्रकाराचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाकडून जाहीर तीव्र निषेध करण्यात येत आहे. व आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावी अशी मागणी बीड जिल्हा अध्यक्ष अशोक होळकर यांनी पत्रकारा द्वारे केली आहे.  

 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages