अमरावती, दि. 23 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : शासकीय तंत्रनिकेतन,अमरावती येथे संस्थेतील प्रथमोपचार समिती, औषधनिर्माणशास्त्र विभाग, रेड रिबन क्लब व महिला विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे प्राचार्य डॉ. अतुल बी. बोराडे, डॉ. महेंद्र गुढे, औषधनिर्माण शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सी. आर. टेनपे आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. महेंद्र गुढे यांनी विद्यार्थ्यांना सीपीआर प्रक्रिया व त्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सीपीआर प्रात्यक्षिक करवून दाखविले तसेच विद्यार्थ्यांकडूनही करवून घेतले. कार्यक्रमासाठी संस्थेचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योत्सना सावनेरे यांनी तर आभार औषधनिर्माण शास्त्र विभागाचा विद्यार्थी प्रणव बारब्दे यांनी केले.
000000
Post a Comment
0 Comments