अमरावती, दि. 23 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाचा भाग म्हणून आणि ‘राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता सेवा पंधरवाडा’ अंतर्गत, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत महसूल विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, संजय गांधी योजना ,शहर अमरावती कार्यालयाने श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे.
शिबिरांमध्ये पेमेंट फेल झालेल्या लाभार्थ्यांना मदत करण्यात येईल. ज्यांचे पेमेंट फेल झाले आहे, त्यांना नवीन पोस्ट खाते उघडून दिले जाईल जेणेकरून त्यांना अनुदान मिळेल. डीएलसी (डिजिटल लाइफ सर्टिफिकेट), ज्या लाभार्थ्यांचे अनुदान डिजिटल लाइफ सर्टिफिकेट नसल्याने थांबले आहे, त्यांचे डीएलसी करून दिले जाईल. तसेच डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) ज्यांनी अद्याप केलेली नाही, त्यांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
लाभार्थ्यांच्या सोयीसाठी, महानगरपालिका प्रभागनिहाय शिबिरे आयोजित केली आहेत: प्रभाग क्र. 2: 23 सप्टेंबर - महानगरपालिका कार्यालय, राजापेठ, प्रभाग क्र. 3: 24 सप्टेंबर- महानगरपालिका कार्यालय, दस्तुर नगर, प्रभाग क्र. 4: 25 सप्टेंबर - महानगरपालिका कार्यालय, बडनेरा, प्रभाग क्र. 5: 26 सप्टेंबर - महानगरपालिका कार्यालय, भाजीबाजार.
संजय गांधी योजना तहसीलदार डॉ. प्रियंका मिसाळ यांनी नागरिकांना या शिबिरांचा लाभ घेण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हा उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी समर्पित असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Post a Comment
0 Comments