Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आष्टी येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन






आष्टी, दि. २४ :
जर नारी स्वस्थ असेल तरच परिवार स्वस्थ आणि सशक्त असेल असे प्रतिपादन डॉ.

प्रवीण परिसे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी काल  येथे केले.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद अमरावती, आयुष्यमान आरोग्य मंदिर आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने

आणि माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, अमरावती यांच्या

सहकार्याने काल  आयुष्मान आरोग्य मंदिर, आष्टी, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती येथे आयोजित केलेल्या

आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मंचावर पल्लवी आगरकर जिल्हा आयुष अधिकारी, डॉक्टर श्वेता सालफले तालुका आरोग्य

अधिकारी, डॉ. प्रवीण खराटे, अस्थिरोग चिकित्सक, जिल्हा परिषदेच्या श्रीमती वनिता शिंदे डॉ. चैतन्य

गजभिये वैद्यकीय अधिकारी आष्टी, डॉ. निखील उप्प्लवार, डॉ. आनंद उल्हे उपस्थित होते.

शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या चाचण्या आणि तपासणीचे चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठा

संखेने नागरिकानी उपस्थित राहत या शिबिराचा लाभ घेतला.

जिल्हा आयुष अधिकारी पल्लवी आगरकर यांनी यावेळी राष्ट्रीय आयुर्वेद दिन याबद्दल आणि आजच्या

आरोग्य सेवेमध्ये आयुर्वेदाचे महत्व याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी पोषण माह च्या अनुषंगाने पोषक खाद्यपदार्थ, फळे आणि भाजीपाला यांचे सुद्धा प्रदर्शन

भरविण्यात आले होते. तसेच आरोग्य विभागातर्फे महिलांसाठी आवश्यक जीवनसत्व आणि औषधी यांची

माहिती देण्याकरिता स्टाल लावण्यात आले होते.

या शिबिराच्या आयोजनासाठी रुनिता गांजरे, रजनीकांत श्रीवास्तव, राजेंद्र लाडे, नालंदा तायडे

आणि इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तसेच केंद्रीय संचार ब्युरोचे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी

शशिकांत पटेल आणि सागर लाडोळे यांचे सुद्धा सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments