* पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, बी ई द्वितीय वर्षाच्या प्रवेशापासून अनेक विद्यार्थी वंचित* - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, September 24, 2025

* पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, बी ई द्वितीय वर्षाच्या प्रवेशापासून अनेक विद्यार्थी वंचित*

अमरावती  दिनांक २५*संदीप सुने*( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

       या वर्षी झालेल्या बी ई च्या प्रवेशा मध्ये पॉलिटेक्निक उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ज्यांना ६० टक्केच्या वर टक्केवारी असून सुद्धा त्यांना  बी ई द्वितीय वर्षाला प्रवेश प्राप्त होऊ शकला नाही .

      संपूर्ण महाराष्ट्रात पॉलिटेक्निक झालेल्या विदयार्थी करिता बी ई द्वितीय वर्षाला १० टक्के जागा इंजीनियरिंग कॉलेज मध्ये उपलब्ध होत्या परंतु पॉलिटेक्निक  मधून उत्तीर्ण होणाऱ्या विध्यार्थी चे प्रमाण १००० असेल तर बी ई च्या द्वितीय वर्षाला त्यांच्याकरिता फक्त १० टक्के जागा उपलब्ध होत्या उरलेल्या ९०० विद्यार्थी याना प्रवेशा पासून वंचित राहावे लागले आहे .हा पॉलिटेक्निक झालेल्या विद्यार्थी वर अन्याय आहे पॉलिटेक्निक विद्यार्थी करिता बी ई द्वितीय वर्षाला प्रत्येक शाखेमध्ये एक वर्ग शिल्लक ठेवणे गरजेचे आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज बरेच विध्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले आहे. महाराष्ट्र शासनाची उच्च शिक्षण मंत्रालयांनी या चुकीच्या पद्धतीने केलेल्या निर्णयाची दुरुस्ती करून सर्व पॉलिटेक्निकच्या विध्यार्थ्यांना वर्ष खाली जाणार नाही या करिता निर्णय घेणे गरजेचे आहे

सर्व विध्यार्थी ची कृती समिती स्थापन करून युवा मोर्चा कडून थोड्या दिवसात सर्व महाराष्ट्रातील विध्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आव्हान करण्यात आले आहे. महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांचा वनवा पेटला तर शासनाला अडचण निर्माण होऊ शकणार आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages