अमरावती, दि. 17 : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि कॉमन सर्विस सेंटर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ गरजू तरुण आणि उद्योजकांना त्यांच्या घराच्या जवळच उपलब्ध होणार आहे.
महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना महामंडळाच्या कार्यालयात जावे लागत होते. मात्र, या नवीन करारामुळे प्रत्येक सीएससी केंद्रावरच अर्ज स्वीकारले जातील. त्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील तरुणांना विशेष फायदा होणार आहे. अर्जदारांना अर्ज करतेवेळी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.
या करारामुळे महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिक वेगाने आणि सहजपणे नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे, असे महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक आकाश मोरे यांनी कळविले आहे.
Post a Comment
0 Comments