Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानात मोफत आरोग्य तपासणी शिबिर


 

अमरावती, दि. 17 : जिल्हा स्त्री रुग्णालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वतीने 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' अभियानांतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर आज बुधवार, दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2  या वेळेत श्रीकृष्णपेठ येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात होणार आहे.

हे शिबिर विशेषतः 30 वर्षांवरील महिलांसाठी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात येणार आहेत. तसेच गरजू व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देखील दिला जाणार आहे.

या उपक्रमाचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments