Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जातीचा दाखला मिळवण्यासाठी विशेष मोहीम


अमरावती, दि. 23 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवापंधरवाडा' निमित्त अमरावती जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत इयत्ता 11 वी आणि 12 वी विज्ञान शाखेतील, सीईटी देणारे तसेच डिप्लोमाच्या तृतीय वर्षातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त श्रीमती जया राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेअंतर्गत अर्जदारांच्या त्रुटी दूर करण्यासाठी विशेष शिबिरे आणि वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचे शिबिर 26 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. तसेच, वेबिनारचे आयोजन 23 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. श्रीमती राऊत यांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घेऊन आपले अर्ज त्वरित सादर करावेत, असे आवाहन केले आहे.

0000

Tags

Post a Comment

0 Comments