'ई-पीक पाहणी' आवश्यक
अमरावती , दि. 17 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : खरीप हंगाम २०२५-२६ साठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किंमतीनुसार, राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कडधान्य आणि तेलबियांची (मूग, उडीद, सोयाबीन, तूर) खरेदी सुरू होणार आहे. ही खरेदी पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने होईल. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘ई-पीक पाहणी’ केलेली असावी आणि त्या पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा सोबत असणे आवश्यक आहे. पणन महासंघाने सर्व शेतकऱ्यांना ‘ई-पीक पाहणी’ची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
Post a Comment
0 Comments