Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मोर्शी येथील खुल्या कारागृहात सिताफळ आणि संत्र्यांच्या झाडांच्या फळांचा लिलाव

अमरावती, दि. 17 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मोर्शी येथील खुल्या कारागृहाच्या जागेवर असलेल्या 400 सिताफळ आणि 300 संत्र्यांच्या झाडांवरील फळांचा लिलाव करण्यात येणार आहे. या संदर्भात, अधीक्षकांनी जाहीर सूचना काढून इच्छुक व्यक्तींकडून मोहोरबंद निविदा  मागविल्या आहेत.

 

निविदा सादर करण्याचा कालावधी 18 सप्टेंबर  ते 22 सप्टेंबर २०२५ या दरम्यान, सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत असणार आहे. या निविदा 23 सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी 4 वाजता अधीक्षक, मोर्शी खुले कारागृह यांच्या कार्यालयात उघडल्या जातील.

  

      या लिलावात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी निविदा फॉर्म, लिलावाच्या अटी व शर्ती, तसेच झाडांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कार्यालयाच्या वेळेत (सुटीचे दिवस वगळून) संपर्क साधावा, असे आवाहन मोर्शी खुले कारागृहाचे अधीक्षक  एस. एस. हिरेकर यांनी केले आहे. या लिलावामुळे शासनाला महसूल मिळण्यास मदत होणार आहे.


Post a Comment

0 Comments