Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शेतकरी गटांनीपिक प्रात्यक्षिकांसाठी महाडिबीटीपोर्टलवर अर्ज सादर करण्याचे आवाहन

 अमरावती :दि. ११ :राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान (अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके) तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये गहू, कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, ऊस, करडई, मोहरी व सूर्यफुल या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पिक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यानुषंगाने शेतकरी गटांनी महाडीबीटी पोर्टलवार पिक प्रात्याशिक या घटकांतर्गत अर्ज सादर करावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक राहुल सातपुते यांनी केले आहे.

 

            या कार्यक्रमांतर्गत ३१ मार्च २०२४ पूर्वी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषि क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांना लाभ देण्यात येणार आहे. या गटांपैकी प्राधिकृत सदस्यास महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा २ सप्टेंबर २०२५ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

            गटांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) या तत्वावर करण्यात येणार असून, अर्ज https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर "बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते" या घटक अंतर्गत करता येतील. शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार अर्ज करणा-या व लाभ घेणाऱ्या गट सदस्यांकडे Farmer ID असणे बंधनकारक आहे.

 

            शेतकरी गटांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले असून अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे ही कळविण्यात आले आहे.

 

00000

 

Post a Comment

0 Comments