अमरावती दि. ६ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी. एल. एड. जून २०२५ परीक्षेचे आयोजन दि. ३ जून ते १२ जून २०२५ या कालावधीत करण्यात आले होते. परीक्षेचा निकाल मंगळवार, दि.०५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वा. परिषदेच्या संकेतस्थळावर (www.mscepune.in) जाहीर करण्यात आलेला आहे.
विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळेल. उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी अर्ज करण्याचा अंतिम दि. २० ऑगस्ट असा राहील, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
Post a Comment
0 Comments