Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अवयव दान जनजागृतीसाठी मोहीम

 दिनांक: ५ ऑगस्ट २०२५ 


अवयव दान जनजागृतीसाठी मोहीम

          अमरावती दि. ६  : अवयव दानाचे प्रमाण वाढावे व अवयव दानच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे तसेच समाजामध्ये या विषयाबाबत सकारात्मक मतपरिवर्तन घडविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ‘अंगदान जीवन संजीवनी अभियान’ अंतर्गत विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत विभागात सर्वत्र १५  ऑगस्ट पर्यंत विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. देहदान, महादान, दुसऱ्याला जीवनदान असे यावर्षीच्या मोहिमेचे घोषवाक्य असून

          सार्वजनिक आरोग्य व कुंटुंब कल्याण मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या मार्गदर्शनात दि. ३  ते १५  ऑगस्ट या कालावधीत अवयव दान पंधरवाडा. ही एक चळवळ म्हणून विभागातील पाचही जिल्ह्यात राबविण्यात  येणार आहे. या कालावधीत व्यापक जनजागृती व समाजभिमुख उपक्रम राबविले जाणार असून या मोहिमेमध्ये शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था व समाज सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

          अवयव दान ही एक सामाजिक बांधिलकी समाजामध्ये या विषयाबाबत सकारात्मक मतपरिवर्तन घडविण्यासाठी प्रभावी जनजागृती अत्यावश्यक आहे. या मोहिमेतून अवयवदाना संबंधी भीती गैरसमज व अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक माहिती लोकापर्यंत पोहोचवीणे महत्त्वाचे आहे. या पंधरवड्यात जिल्हा, तालुका, शाळा, महाविद्यालय तसेच आरोग्य संस्था स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून दि. १५ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर अवयव दान दात्याचा व त्यांच्या कुटुंबीयांचा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करून मोहिमेला प्रेरणादायी स्वरूप दिले जाणार आहे.

          अवयव दान पंधरवड्यामध्ये सोशल मीडिया जनजागृती मोहीम अवयव दानावर ऑनलाईन व्याख्यान रुग्णालय/क्लिनिक मध्ये क्यूआर कोड पोस्टर प्रदर्शन, बाह्यरुग्ण प्रतीक्षालयात आरोग्य विषयक मार्गदर्शन, बाजारपेठामध्ये माहितीपत्रके वाटप, शाळा/रुग्णालयामध्ये संकल्प भिंत/वृक्षारोपण, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी जागरूकता सत्र, महाविद्यालयांमध्ये पोस्टर/रांगोळी स्पर्धा, स्थानिक कार्यक्रमात जनजागृती स्टॉल, अवयव दान जनजागृती रॅली असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

*****

Post a Comment

0 Comments